Ad will apear here
Next
‘बांधकामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज’
मेजर जनरल डॉ. एच. के. अरोरा यांचे प्रतिपादन
‘कॉन्स्ट्रो २०२०’ या प्रदर्शनाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करताना डावीकडून नीळकंठ जोशी, संजय वायचळ, विश्वास लोकरे, डॉ. एच. के. अरोरा, नरेन कोठारी आणि जयदीप राजे.

पुणे : ‘आज बांधकाम व्यवसायात ज्ञानवर्धित संशोधन आणि अत्याधुनिक प्रशिक्षणाची कास धरली जावी, तसेच बांधकामाची प्रक्रिया ही उत्तम दर्जा साधत वेगवान व्हावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञान अर्थात ‘मेकॅनाइज्ड अॅंड इंटेलिजन्ट कन्स्ट्रक्शन’ ही काळाची गरज आहे,’ मत ‘कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग’चे (सीएमई) अधिष्ठाता व डेप्युटी कमांडंट मेजर जनरल डॉ. एच. के. अरोरा यांनी व्यक्त केले.

‘पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनीअरिंग रिसर्च फांउडेशन’तर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी फांउडेशनचे अध्यक्ष विश्वास लोकरे, सचिव जोशी, संस्थेचे अन्य पदाधिकारी संजय वायचळ, जयदीप राजे व नरेन कोठारी या वेळी उपस्थित होते. बांधकामासाठी आवश्यक यंत्रसामग्री, साहित्य, पद्धती आणि प्रकल्प या संबंधीचे सर्वांत मोठे प्रदर्शन म्हणून ओळखले जाणाऱ्या ‘कॉन्स्ट्रो’च्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन डॉ. अरोरा यांच्या हस्ते या वेळी करण्यात आले. रेसिडेन्सी क्लब येथे हा समारंभ नुकताच पार पडला. 

या वेळी बोलताना डॉ. अरोरा म्हणाले, ‘‘पीसीआरएफ’ या संस्थेच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रात असलेल्या तंत्रज्ञानातील ताजे व नवे प्रवाह या व्यवसायाशी संबंधितांना आणि सामान्य नागरिकांनाही जाणून घेता येतात. या संबंधित क्षेत्रांसाठी ‘पीसीईआरएफ’ संस्था एक मार्गदर्शक म्हणून करीत असलेले काम वाखाणण्याजोगे असून, त्यामुळे समाजाप्रती आपली बांधिलकी संस्था दाखवून देत आहे याचा आनंद आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZVZCA
Similar Posts
‘काँक्रीट पर्यावरणपूरक बनवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान फायदेशीर’ पुणे : ‘स्वातंत्र्यपूर्व काळ ते आजपर्यंतचा काळ पाहिला, तर काँक्रीट हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. गेल्या काही दशकांपासून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून काँक्रीटमध्ये तुलनेने अधिक पर्यावरणपूरक असलेल्या घटकांचा अंतर्भाव केला जात आहे. त्यामुळे काँक्रीटची गुणवत्ता सुधारून ते पर्यावरणपूरक होण्यास
साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम पुणे : पुण्यामध्ये येत्या रविवारी २८ जानेवारी रोजी ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य, त्यांची विक्रमी विक्री यातून सुरू झालेले विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, लोकजीवन आणि ग्रामीण शहरी जीवनशैलीचा समन्वय
‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ पुणे : ‘संशोधन क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. यामुळे आता होणारे संशोधन हे शास्त्रीयदृष्टया योग्य असले, तरी ते एकांगी पद्धतीचे आहे. विविध प्रकारच्या संशोधनांमध्ये महिलांचा सहभाग वाढला तर संशोधनाचे स्वरूप बदलेल,’ असे मत जीवशास्त्र विषयातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’च्या (आयसर) शास्त्रज्ञ डॉ
‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर पुणे : सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील हरिश्चंद्रगडचा कोकण कडा, नागफणी, नानाचा अंगठा, मोरोशीचा भैरावगड, माहुलीचा बाण, नवरा-नवरी अशा अनेक सुळक्यांवर यशस्वी चढाया करणाऱ्या तसेच नाशिक त्रिंबकेश्वर पासून ते आंबोली पर्यंतच्या साह्यवाटा आणि गडकिल्ल्यांच्या यशस्वी मोहीमा राबवून तरुण पिढीला  गिर्यारोहण क्षेत्रामध्ये

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language